डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ? कोणते विटामिन्स महत्त्वाचे आहेत ?

आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा असा अवयव आहे : डोळे. डोळ्यांमुळेच आपण हे जग बघू शकतो ,सर्व अनुभवू शकतो. डोळ्यांना काही समस्या उद्भवल्यास नक्कीच आपल्या दैनंदिन जीवन शैलीवर त्याचा परिणाम होतो. सतत वाचन करणे, दिवसभर स्क्रीनवर काम करणे, तसेच दृष्टी संबंधी इतर काही कार्य करणे यामुळे तसेच इतर काही कारणास्तव डोळ्यांच्या काही समस्या उद्भवू शकतात. ही सर्व कामे करत असताना सुद्धा डोळ्यांची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि डोळ्यांसाठी कोणते विटामिन्स महत्त्वाचे आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत…

डोळ्यांसाठी कोणते विटामिन्स महत्त्वाचे आहेत ?

१. डोळ्यांसाठी आवश्यक असणारे काही प्रमुख विटामिन्स हे पुढील प्रमाणे आहेत 

विटामिन ए : विटामिन ए हे डोळ्यांचे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असून विटामिन ए ची कमतरता झाल्यास रात्रीची दृष्टी कमी होऊ शकते. म्हणूनच विटामिन ए असलेले फळे भाज्या तसेच इतर आहार घेतला पाहिजे. विटामिन ए चा मुख्य स्रोत गाजर, पालक, हिंग, पेरू तसेच सफरचंद हे आहेत. तसेच रताळे, टोमॅटो, टरबूज, लाल शिमला मिरची, हिरव्या पालेभाज्या यांचा सुद्धा समावेश आहारामध्ये करावा.

विटामिन सी : विटामिन सी हे डोळ्यांना मोतीबिंदू होण्यापासून म्हणजेच डोळ्याच्या लेंसेस धुंद होण्यापासून तसेच इतर डोळ्याच्या विकारापासून संरक्षण करतो. विटामिन सी हे अँटिऑक्सिडंट ने युक्त असून मुक्त रॅडिकल्स जे डोळ्यांसाठी हानिकारक आहे त्यापासून विटामिन सी बचाव करते. विटामिन सी असलेला आहार नक्की घेतला पाहिजे यामध्ये संत्री, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली यांसारख्या पदार्थांचा समावेश करू शकतात. तसेच इतर लिंबूवर्गीय फळे, काळी मिरी यांचा सुद्धा समावेश आपल्या आहारामध्ये करावा.

विटामिन ई : डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी विटामिन ई सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विटामिन ई डोळ्यांना बाह्य घटकांपासून जसे की प्रदूषण, धूर यांपासून संरक्षण देते. विटामिन ई हे पेशींचे सुद्धा संरक्षण करते. विटामिन ई चे मुख्य स्रोत आहेत : बदाम, अक्रोड, सोयाबीन, शेंगदाणे, पालक, मोहरीचे तेल, सूर्यफूल, बीट. विटामिन ई असलेल्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करावा.

विटामिन बी : पेशीच्या मेटाबोलिझम मध्ये विटामिन बी हे महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरामध्ये विटामिन बीची जर कमतरता असेल तर काचबिंदू होण्याची शक्यता असते. विटामिन बी चे स्रोत आहेत : दही, दूध, डाळी, बदाम, हिरव्या पालेभाज्या.

ओमेगा 3 फॅटी ऍसिड 

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सुद्धा आवश्यक आहेत. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे डोळ्याच्या विकारांना कमी करतात तसेच डोळ्यांच्या कोरड्या होण्याच्या स्थिती पासून सुद्धा  डोळ्यांना वाचवतात. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असलेले स्रोत आहेत: जवस, अक्रोड, चिया सीड्स.

२. डोळ्यांसाठी योग्य झोप सुद्धा आवश्यक आहे 

आपल्या शरीरासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्यवस्थित झोप सुद्धा आवश्यक आहे. झोपेच्या दरम्यान डोळ्यांना आराम मिळतो.

३. डोळ्यांचा सराव करणे 

डोळ्यांचा थोडासा सराव करू शकतात जसे की,

– काही सेकंदासाठी डोळे वर खाली तसेच डावीकडे उजवीकडे फिरवून डोळ्यांना आराम देणे.

– डोळे बंद करून दहा सेकंद थांबणे आणि नंतर डोळे उघडणे.

२०-२०-२० नियम : जर दिवसभर स्क्रीनवर जास्त काम करत असाल तर अशावेळी दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फुटांच्या अंतरावर असलेल्या वस्तूकडे पहावे असे केल्यामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होतो.

तसेच इतरही डोळ्यांचे सराव नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार करू शकतात.

४. डोळ्यांसाठी योग्य संरक्षण आवश्यक आहे 

– सूर्याच्या यू व्ही किरणांमुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते यामुळे मोतीबिंदू तसेच इतर डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता होऊ शकते म्हणून घराबाहेर पडताना नेहमी यू व्ही संरक्षण असलेले सनग्लासेस घालणे आवश्यक आहे.

– धूळ, प्रदूषण यांसारख्या गोष्टींमुळे सुद्धा डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. जास्त हवेच्या संपर्कामध्ये गेल्यानंतर सुद्धा डोळ्यांना थकवा जाणवू शकतो. म्हणून डोळ्यांचा प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी चष्म्याचा उपयोग करू शकता यामुळे डोळ्यांना प्रदूषण तसेच धुळीमुळे होणारा धोका कमी होईल.

५. नियमित डोळ्यांची तपासणी करावी 

डोळ्यांची नियमित तपासणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या डोळ्यांना काही लक्षणे जाणवली जसे की डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळ्यांना पाणी येणे, धूसर दृष्टी होणे यांसारख्या काही कारणांमुळे डोळ्यांना विकार होऊ शकतात म्हणूनच वेळ जाण्यापूर्वीच जर नियमित डोळ्यांची तपासणी होत असेल तर डोळ्यांचा कुठलाही विकार सुरुवातीच्या टप्प्यातच नेत्र तज्ञांच्या लक्षात येऊ शकतो आणि त्यावर योग्य ते उपचार केले जाऊ शकतात.

६. स्मोकिंग आणि अल्कोहोल पासून दूर राहावे 

स्मोकिंग करणे तसेच अल्कोहोल घेणे हे सुद्धा डोळ्यांचे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. स्मोकिंग मुळे डोळ्यांमध्ये सूज येणे, दृष्टी धूसर होणे तसेच इतरही डोळ्यांचे अनेक विकार होऊ शकतात. अल्कोहोल सुद्धा डोळ्यांचे आरोग्य धोक्यात आणू शकते म्हणून स्मोकिंग आणि अल्कोहोल पासून दूर राहावे.

अशाप्रकारे जर डोळ्यांचे योग्य काळजी घेतली तर आपली दृष्टी ही आयुष्यभर चांगली राहू शकते परंतु त्यासाठी आपल्या आहारामध्ये योग्य विटामिन्सचा समावेश असणे तसेच डोळ्यांची व्यायाम करणे, व्यवस्थित झोप घेणे आणि प्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या डोळ्यांची व्यवस्थित काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

About Hi Tech Eye Surgery Center

Hi Tech Eye Surgery Center हे उंदरी, कोंढवा आणि NIBM मधील सर्वोत्कृष्ट नेत्र निगा केंद्र आहे, जे तुमच्या सर्व दृष्टीच्या गरजांसाठी उत्कृष्ट सेवा आणि प्रगत उपचार प्रदान करते. अत्यंत कुशल नेत्रतज्ज्ञांच्या टीमसह आणि नवीनतम तंत्रज्ञानासह, केंद्र अचूक निदान आणि प्रभावी शस्त्रक्रिया सुनिश्चित करते, अपवादात्मक काळजी आणि परिणाम प्रदान करते. तुम्हाला नेहमीच्या डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा विशेष उपचारांची आवश्यकता असेल, तर Hi Tech Eye Surgery Center येथे अवश्य भेट द्या.

To Book An Appointment Contact us at this number – +917420817072