डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली
डोळे आपल्या शरीराचे अत्यंत महत्वाचे अवयव आहेत. त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. आपली दृष्टी सुरक्षित ठेवणे तसेच निरोगी ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैलीच्या काही टिप्स बघूयात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार
डोळ्यांचे आरोग्य व्यवस्थित रहावे तसेच सुधारावे यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. पुढील जीवनसत्वे आपल्या आहारामध्ये असणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत :
१.व्हिटॅमिन A :
व्हिटॅमिन A डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, म्हणूनच ज्या पदार्थांमध्ये विटामिन ए आहे ते पदार्थ सेवन केले पाहिजे. यामध्ये गाजर, किवी ,पेरू आणि पपई सारख्या फळांचे सेवन करा.रताळे ,शिमला मिरची, ब्रोकोली , पालेभाज्या आणि कडधान्यांचा समावेश सुद्धा आहारामध्ये केला पाहिजे.
२. ओमेगा-3 फॅटी ऍसिड :
किवीफ्रूट, एवोकॅडो, बेरी , पपई ,चिया बिया,फ्लॅक्ससिड्स आणि संत्र्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स चांगल्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे या गोष्टींचा आहारामध्ये समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
३. व्हिटॅमिन E :
विटामिन ई मुळे सुद्धा डोळ्यांची दृष्टी सुधारण्यामध्ये तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यामध्ये मदत होते, विटामिन ई हे मुक्त रॅडिकल्स मुळे डोळ्यांना नुकसान होऊ नये याची काळजी घेतात. आंबा, किवी, ब्लॅकबेरी, सूर्यफूल तेल, बदाम, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या, बीट, लाल मिरची, भोपळा, सोयाबीन यामधून व्हिटॅमिन ई आपल्याला मिळू शकते.
४. व्हिटॅमिन C :
हे व्हिटॅमिन्स मोतिबिंदू आणि वयोमानानुसार संबंधित डोळ्यांच्या समस्यांना प्रतिबंधित करण्यात मदत करतात. व्हिटॅमिन सी हे कोलेजनच्या निर्मितीसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे.संत्रे, बेरीज, मोसंबी, स्ट्रॉबेरी, लिंबूवर्गीय फळे, ब्रोकोली, मिरपूड आणि नट्स यांचा समावेश डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आहारामध्ये करावा.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी नक्की कोणती फळे किंवा आहार आपण घेतला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांना काय फायदा होतो हे बघुयात :
- किवी : तीन किंवा त्यापेक्षा अधिक किवी फळ खाल्ल्यामुळे 30 टक्के मॅक्युलर डीजेनरेशन कमी करण्यासाठी मदत होते असे एका अभ्यासामध्ये दिसून आले आहे.
- पालक : पालकांमधील बिटा कॅरोटीन व ल्युटीन हे डोळे निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
- संत्री : संत्री मध्ये विटामिन ए, अल्फा – बीटा कॅरोटीन , फायबर्स, ल्युटीन हे आणि इतरही अँटिऑक्सिडंट असतात यांचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी होतो.
- पपई : पपईमध्ये विटामिन ए, सी आणि इ असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यामध्ये मदत होते तसेच मोतीबिंदू, काचबिंदू यांसारख्या डोळ्यांच्या आजारांपासून सुद्धा संरक्षण होण्यास मदत होते.
- गाजर : गाजरामध्ये जास्त प्रमाणामध्ये बीटा कॅरोटीन असते आणि गाजर हे विटामिन ए चे सुद्धा उत्तम स्रोत आहे. बीटा कॅरोटीन हे मॅक्युलर डीजेनरेशन तसेच मोतीबिंदूपासून संरक्षण करण्यासाठी मदत करते.
- आवळा : विटामिन सी चा आवळा हा चांगला स्रोत असल्याने आवळा दृष्टी टिकवून ठेवण्यामध्ये तसेच सुधारण्यामध्ये मदत करतो.
- द्राक्षे : द्राक्ष खाल्ल्यामुळे मधुमेह न्यूरोपॅथीशी संबंधित नैसर्गिक बदलामुळे होणारे परिणाम तसेच नुकसान कमी होते आणि मधुमेहामुळे दृष्टी खराब होऊ शकते ही शक्यता सुद्धा कमी होते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैली :
१. नियमित व्यायाम करावा :
नियमित व्यायाम केल्यामुळे डोळ्यांसोबतच इतर शरीराचे आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहते. दररोज योगा किंवा व्यायाम करावा किंवा चालण्याचा व्यायाम सुद्धा करू शकतो तसेच ज्यांना पोहण्याची आवड आहे ते पाण्यामध्ये पोहू शकतात . अशाप्रकारे नियमित व्यायाम केल्यामुळे डोळ्यांसोबतच इतर सर्व अवयवांची आरोग्य चांगले राहते.
२. दररोज व्यवस्थित झोप घ्यावी :
प्रत्येक व्यक्तीने रात्री ७-८ तासांची झोप घेणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. जर झोपेचा अभाव झाला तर अशावेळी डोळ्यांमध्ये ताण येतो आणि डोळ्याच्या समस्या जाणवतात.
३. डिजिटल उपकरणांचा कमी वापर करावा :
हल्लीच्या डिजिटल युगामध्ये डिजिटल उपकरणांचा वापर सुद्धा अधिक वाढला आहे,डिजिटल उपकरणांवर जास्त वेळ घालवल्यास डोळे थकतात आणि डोळ्यांच्या समस्या जाणवू शकतात. म्हणूनच 20-20-20 नियम वापरू शकता.प्रत्येक 20 मिनिटांनी, 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर बघावे असे केल्यामुळे डोळ्यांना काही सेकंदासाठी का होईना आराम मिळतो.
४. सूर्याच्या किरणांपासून संरक्षण :
सूर्याच्या UV किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडतानी नेहमी चष्म्याचा वापर करावा. यू व्ही संरक्षण असलेल्या चष्म्याचीच निवड करावी.
५ . नियमित आरोग्य तपासणी करावी :
डोळ्यांच्या आरोग्यासाठी नियमित नेत्रतपासणी करणे आवश्यक आहे. चाळिशीनंतर किंवा वयोमानानुसार डोळ्याच्या समस्या जाणवायला लागतात यासाठी नियमित किमान वर्षातून एकदा तरी डोळ्यांची आरोग्य तपासणी करावी.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेणे आणि जीवनशैली उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहेत. तुमच्या आहारात आणि दिनचर्येमध्ये वरील टिप्सचा समावेश करून, तुम्ही डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकता. डोळ्यांची व्यवस्थित काळजी घेतल्यास, तुम्ही चांगली दृष्टी टिकवून ठेवू शकता आणि डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवता येईल. जर तुम्हाला डोळ्यांसंबंधीत काही समस्या असतील तर हायटेक आय सर्जरी सेंटर येथे संपर्क साधू शकता.
To Book An Appointment Contact us at the below Numbers
Undri – +917420817072 | Kondhwa – 020 268355088