डोकेदुखी हे डोळ्यांच्या समस्याचे लक्षण आहे का ?
डोकेदुखी हे सामान्य वाटत असले तरी सुद्धा ज्या लोकांना डोकेदुखीच्या वेगवेगळ्या प्रकारांना तोंड द्यावे लागते त्यांना त्याच्या वेदना काय असतात हे चांगलेच माहीत असते. काही वेळा डोकेदुखी थोड्या वेळासाठी असू शकते तर कधी दीर्घकाळासाठी असू शकते तसेच कधी ही डोकेदुखी सौम्य असू शकते तर कधी तीव्र असू शकते. डोकेदुखी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात त्यामागील एक कारण हे डोळ्यांच्या समस्या सुद्धा आहे. डोळ्यांच्या समस्यांपैकी डोळ्यांचे दृष्टीदोष, लांब किंवा जवळचे न दिसणे, डोळ्यांना ताण येणे यांसारखी कारणे डोकेदुखीसाठी असू शकतात. प्रत्येक वेळी डोकेदुखी ही डोळ्याच्या समस्यांमुळेच होते असे नसून आपल्याला जी डोकेदुखी होत आहे ती डोळ्याच्या समस्येमुळे होत आहे की इतर कोणती कारणे आहेत यासाठी नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डोकेदुखी आणि डोळ्यांच्या समस्यांचे संबंध
– दृष्टीदोष आणि डोकेदुखी
जर आपल्या डोळ्यांना चांगले दिसत नसेल, दृष्टीदोष असेल तर अशावेळी डोकेदुखी होऊ शकते. उदाहरणार्थ लांब किंवा जवळचे न दिसणे यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण पडू शकतो आणि हाच डोळ्यांचा ताण डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकतो.
– डोळ्यांचा ताण
एकच काम दीर्घकाळासाठी करणे ज्यामध्ये डोळ्यांचा जास्त उपयोग केला जातो उदाहरणार्थ अधिक वेळ वाचन करणे, जास्त वेळ स्क्रीनवर काम करणे त्यामध्ये लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोन यांचा समावेश असू शकतो तसेच प्रकाश कमी असलेल्या ठिकाणी काम करणे यांसारख्या गोष्टींमुळे डोळ्यांवर ताण निर्माण होऊ शकतो. हाच डोळ्यांचा ताण डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकतो.
– मायग्रेन आणि डोळ्यांच्या समस्या
मायग्रेन हा तीव्र डोकेदुखीचा एक प्रकार असून यामध्ये डोळ्यांभोवती तसेच डोक्याच्या एकाच बाजूला तीव्र वेदना होऊ लागतात. या डोकेदुखीचे एक कारण डोळ्यांवर अधिक ताण येणे किंवा खराब दृष्टी असणे यांसारख्या डोळ्यांच्या समस्या आहेत.
– डोळ्यांतील इनफेक्शन्स आणि सूज
डोळ्यांतील कोणतेही इनफेक्शन्स किंवा सूज ,जसे की कंजक्टिव्हायटिस डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकतात. यामध्ये डोळ्यांची सूज किंवा जळजळ किंवा डोळ्याचे इतर इन्फेक्शन डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकते.
– ऑप्टिक न्यूराइटिस
ऑप्टिक न्यूराइटिस ही डोळ्यांच्या समस्येची एक गंभीर स्थिती आहे, ज्यामध्ये ऑप्टिक नर्व्हला सूज येते. यामुळे दृष्टीदोष आणि डोकेदुखी या समस्या उद्भवू शकतात.
डोळ्यांच्या समस्येपासून डोकेदुखी टाळण्यासाठी उपाय
– डोळ्यांना आराम द्या
दीर्घकाळपर्यंत स्क्रीनवर काम करत असाल तर अशावेळी थोडा वेळ मध्ये ब्रेक घ्यावा तसेच 20-20-20 या नियमाचा म्हणजेच दर प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट अंतरावरील वस्तूकडे बघावे यामुळे डोळ्यांना काही सेकंदासाठी आराम मिळेल.
– डिजिटल स्क्रीनचा कमी वापर
स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांचा उपयोग कमी प्रमाणात करा.
– वेळोवेळी नेत्र तपासणी करा
वेळोवेळी नेत्र तज्ञांकडून नेत्र तपासणी करणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे असे केल्यामुळे डोळ्यांसंबंधीत काही समस्या असल्यास त्यावेळीच डॉक्टरांच्या लक्षात येऊन त्यावर योग्य ते उपचार करणे शक्य होते.
– योग्य प्रमाणामध्ये पाणी प्या
पाणी कमी पिण्यामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते, म्हणूनच आपल्या शरीरासाठी आवश्यक तितके पाणी पिणे गरजेचे आहे.
– योग किंवा ध्यान करू शकता
काही वेळा मानसिक ताण-तणावामुळे सुद्धा डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते म्हणूनच मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करू शकता.
डोकेदुखी आणि डोळ्याच्या समस्या यांचा संबंध आहे परंतु दरवेळी डोकेदुखी ही डोळ्याच्या समस्या मुळेच होईल असे नाही म्हणून तीव्र आणि दीर्घकाळ डोकेदुखी जाणवत असल्यास नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर डोळ्याच्या समस्यांमुळे डोकेदुखी होत असेल तर डोळ्याच्या समस्या कमी करण्याचा किंबहुना नष्ट करण्याचा प्रयत्न डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा यामुळे डोळ्याच्या समस्या तसेच डोकेदुखी ही समस्या सुद्धा नाहीशी होण्यास मदत होईल. डोळ्याच्या समस्या असो किंवा डोक्याच्या समस्या डॉक्टरांचा योग्य सल्ला नक्की घ्यावा. तुम्हालाही डोळ्याच्या समस्या जाणवत असतील तर Hi Tech Eye Surgery Center येथे संपर्क करू शकता.
संपर्कासाठी फोन नंबर –
Undri Clinic Address – Office no. 118, 119 first floor, Undri City Center Mall, Bellagio, Undri, Pune, Maharashtra 411060
Kondhwa Clinic Address – Office No-1,2, 1st Floor, Parmar Pavan, Kondhwa Main Rd, near Domino’s Pizza, near Fakhri Hills, Fullnagar, Fakhri Hills, Kondhwa, Pune, Maharashtra 411048